बालकल्याण पोलीस अधिकारी (CWPO) व विशेष बाल पोलीस पथक (SJPU) मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देणेबाबत शासन निर्णय.
बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम,२०१५ च्या कलम १०७ अन्वये राज्यातील सर्व पोलीस घटक स्तरावर विशेष बाल पोलीस पथक (SJPU-Special Juvenile Police Unit) स्थापन करण्यात आले आहे. तसेच, राज्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर, बालकल्याण पोलीस अधिकारी (CWPO-Child Welfare Police Officer) यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१८ मधील, नियम ९२ अन्वये, या पथकामाधिल कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे नियमित प्रशिक्षण होणे अपेक्षित आहे.
मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद मधील Suo-Moto Criminal PIL No.1/2025 मध्ये, दिनांक 10.02.2026 रोजीच्या आदेशात, CWPO व SJPU मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची बदली झाल्यानंतर, नवीन ठिकाणीही त्यांना तेच कर्तव्य देणेबाबत तसेच, एकंदरीत सर्व प्रक्रिया व निर्णय यांमध्ये एकसंघता राहण्यासाठी, पोलीस दलामध्ये नवनियुक्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना, संस्थात्मक पातळीवरच (अकॅडमी स्तरावर) प्रशिक्षण देणेबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णय
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने, खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
- अपर पोलीस महासंचालक, (प्रशिक्षण व खास पथके ) यांनी, CWPO व SJPU मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या प्रशिक्षणासाठी, एक विशेष प्रशिक्षण मॉड्यूल (Specialized Training Module) तयार करावे.
- राज्य पोलीस दलाच्या सर्व शिखर प्रशिक्षण संस्था व इतर प्रशिक्षण संस्थांच्या, पायाभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमात (Basic Training Curriculum) व उजळणी प्रशिक्षण अभ्यासक्रमात (Refresher Training Curriculum) सदर विशेष प्रशिक्षण मॉड्यूलचा समावेश करणे अनिवार्य राहील.
- उपरोक्त प्रमाणे प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनाच CWPO व SJPU मध्ये पदस्थापना देण्यात यावी.
- CWPO व SJPU मध्ये नव्याने पदस्थापना झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी, सदरचे प्रशिक्षण घेतलेले नसल्यास, त्यांना पदस्थापनेच्या, एका महिन्यात सदर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे.
शासन निर्णय पहा
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202603201118521129.pdf