The Basis of the Constitution , संविधानाचा मूलाधार

संविधानाचा मूलाधार

संविधान हा एक संमिश्र दास्तेवज असून त्याचा केवळ कायदा म्हणून नव्हे तर कायदा बनविणारी यंत्रणा म्हणून अर्थ लावला पाहिजे. भारत सरकारच्या लोकशाही कारभारासाठी त्याची तरतूद केलेली आहे. आपले संविधान हे एक लिखित स्वरूपाचे संविधान आहे. दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० पासून आपले संविधान अंमलात आले .

भारतीय साविधानाने पुधिक संस्थानातील संबंध निश्तित व निर्धारित केले आहेत ,

  • विविध संस्था व शासनाची क्षेत्रे
  • कार्यकारी वैधानिक व न्यायिक संस्था
  • केंद्र सरकार राज्य सरकार व स्थानिक शासन
  • लोक व शासन
  • राजकीय सामाजिक व आर्थिक प्रश्न

आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे त्यामध्ये 22 भाग व 395 अनुच्छेद आहेत. मात्र अनुच्छेदांची प्रत्यक्ष संख्या 444 इतकी आहे. या अनुच्छेदान पैकी अनेक अपवाद व मर्यादा आहेत. त्यास बारा अनुसूचा जोडलेल्या आहेत. 2007 पर्यंत त्यात 93 सुधारणा करण्यात आले आहेत.

आपल्या संविधानामध्ये संघराज्य पद्धतीची सविस्तर चर्चा केलेली आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकार यांची रचना आणि केंद्र व राज्य सरकार यांच्या अधिकारांची व अधिकारी तेजी सुस्पष्ट व सुनिश्चितपणे विभागणी करण्यात आली आहे. वैधानिक संबंध प्रशासकीय संबंध वित्तीय संबंध व आंतरराज्य व्यापार व वाणिज्य या प्रकरणांची सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या विषयांचा दृष्टिकोन स्पष्ट केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *